श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्व खटले मथुरेतील न्यायालयातच चालवण्यासाठी मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणातील सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात चालवले जावेत, या निर्णयाच्या विरोधात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. याद्वारे हा निर्णय रहित करून सर्व खटले मथुरेतील न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.