(म्हणे) ‘प्रतिदिन लोक नदी किंवा तलाव येथे बुडून मरत असतात !’ – महादेव सिंह खंडेला, आमदार, अपक्ष

खड्ड्यामध्ये बुडून मेलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूवर अपक्ष आमदाराचे असंवेदनशी उत्तर !

महादेव सिंह खंडेला

सीकर (राजस्थान) – पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. याविषयी राजस्थान किसान आयोगाचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार महादेव सिंह खंडेला यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी ‘प्रतिदिन लोक मरत असतात, कधी नदीमध्ये, तर कधी तलावामध्ये डुबून मरतात’, असे असंवेदनशील उत्तर दिले. यावरून वाद झाल्यानंतरही त्यांनी स्वतःच्या विधानाचा बचाव केला.

संपादकीय भूमिका 

अशा आमदारांची आमदारकी रहित करण्याची मागणी जनतेने सरकारकडे केली पाहिजे !