कर्नाटकमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !
कर्नाटकमध्ये हिंदू असुरक्षित !
मैसुरू (कर्नाटक) – क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा शेवट वेणुगोपाल नायक (वय ३२ वर्षे) या हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या हत्येत झाला. म्हैसुरूच्या टी नरसीपुरा येथे ही घटना घडली.
‘Yuva Brigade’ member stabbed to death after ‘Hanuma Jayanti’ celebrations in #Mysuru districthttps://t.co/iM9WxMQSeh pic.twitter.com/4q6yHfIH6L
— Hindustan Times (@htTweets) July 10, 2023
या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.