परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान !
गुळूंचे (जिल्हा पुणे) – आषाढी एकादशीनंतर निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील शेवटचा मुक्काम आटोपून ८ जुलैला सकाळी पुणे जिल्ह्यात आला होता. फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका विश्वस्त योगेश देसाई, राजाभाऊ आरफळकर चोपदार यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात नीरा (ता. पुरंदर) येथील दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजता पालखी सोहळा उत्साहात नीरा नगरीत दाखल झाला आणि येथील विठ्ठल मंदिरात विसावला. माऊलींच्या पादुका रथातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.