अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूरकडून आरोग्य शिबिर !
कोल्हापूर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ९ जुलैला ७५ वा स्थापना दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कोल्हापूर शहरातील कावळा नाका सेवा वस्तीत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी अभाविप कोल्हापूरचे वेदांत कुलकर्णी, अजय इटकी, अद्वैत पुगावकर, दीपक नडमाने आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरासाठी सेवा भारती इचलकरंजी आणि डॉ. शिवाजी पवार यांचे सहकार्य लाभले.