भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी धर्माचे शिक्षण देणे आवश्‍यक !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘मध्‍यंतरी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्‍यमंत्र्यांना ‘तलाठ्यापासून ते वर्ग एकच्‍या अधिकार्‍यांपर्यंत कोणत्‍या कामासाठी, कोणत्‍या दराने लाच घेतली जाते’, याचे दरपत्रकच सामाजिक माध्‍यमांमध्‍ये प्रसारित केले होते. ‘प्रत्‍यक्षामध्‍ये गुन्‍हा नोंद होणे, आरोपपत्र प्रविष्‍ट होणे, खटल्‍यासाठी अनुमती न मिळणे, खटल्‍यांची सुनावणी लांबणे, साक्षीदारांच्‍या फितुरीचे प्रमाण वाढणे आदी गुन्‍हा सिद्ध होण्‍यातील अडथळे आहेत’, असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. सध्‍या अभियोग (खटला चालवण्‍यासाठी) पूर्वसंमतीसाठीची २८२ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. त्‍यांतील शासनाकडे १०८, तर सक्षम अधिकार्‍यांकडे १७४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्‍यांतील ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी संपल्‍याची २०६, तर ९० दिवसांपेक्षा अल्‍प दिवस असल्‍याची ७६ प्रकरणे प्रलंबित आहेत. आपण सर्वच जण ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त भारता’चे स्‍वप्‍न पहात आहोत; पण प्रत्‍यक्षात भ्रष्‍टाचार हा पुष्‍कळ खोल रुजलेला दिसून येत आहे. नोकरशहा, राजकारणी आणि गुन्‍हेगार यांच्‍यातील दुवा हेच भ्रष्‍टाचाराचे कारण आहे. सध्‍या कोणतेही साधे सरकारी काम लाच दिल्‍याविना होतांना दिसून येत नाही आणि असा अनुभव प्रत्‍येक भारतियाला कुठे ना कुठे येतोे. भ्रष्‍टाचार संपवायचे सध्‍याचेे प्रयत्न हे अगदी वरवरचे आहेत. खरा भ्रष्‍टाचार संपवायचा असेल, तर प्रत्‍येक भारतियाला धर्माचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे; कारण त्‍यामुळे मनुष्‍य नीतीमान, सुसंस्‍कारी, निर्मोही आणि समाधानी बनतो !’

– श्री. अमोल चोथे, पुणे  (१४.६.२०२३)