पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार घोषित !
पुणे – ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या अंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासियांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून देशाला जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ‘ट्रस्ट’च्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली असल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
#Lokmanya_Tilak_National_Award | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर, 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर (व्हिडिओ)@Policenama1 #policenama @BJP4Maharashtra @PMOIndia @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis @PawarSpeaks https://t.co/HGwJCkqeLf
— Policenama (@Policenama1) July 10, 2023
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्या विचारांशी कधीपासून जुळायला लागले ?,’ असा प्रश्न उपस्थित करून शहर आणि प्रदेश काँग्रेसने थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडेच डॉ. रोहित टिळक यांच्याविषयी तक्रार करण्यात आली.