ताप आलेल्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करू नये !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१३
‘ताप आलेला असतांना भूक मंदावते आणि ‘काही खाऊ नये’, असे वाटते. अशा वेळी काही न खाता उपवास केल्यास ताप लवकर बरा होण्यास साहाय्य होते. रुग्णाने उपवास करायचे ठरवले, तरी घरची मंडळी त्याला थोडेसे जेवण्याचा आग्रह करतात. ‘खाल्ले नाही, तर शक्ती मिळणार नाही’, असा सर्वसाधारण समज असतो; परंतु ‘प्रत्येकाच्या शरिरात अन्नाचा राखीव साठा असल्याने १ – २ दिवस काही न खाता उपवास केल्यास काही अपाय होत नाही’, हे लक्षात घ्यावे आणि तापाच्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |