उल्हासनगर येथील भाजपाचे नरेश रोहरा यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार
उल्हासनगर – येथील भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. त्यांच्या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. ‘कॅम्प क्रमांक ५’च्या प्रभाराम मंदिराच्या शेजारी त्यांचे कार्यालय आहे. (असुरक्षित उल्हासनगर ! – संपादक)
हत्यारे असलेले तरुण कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, ‘‘नवीन यांचा पाठलाग सोडा नाहीतर नरेशला गोळी मारू.’’ त्यामुळे अंगरक्षकांनी त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले आणि त्यांच्यापैकी एकाला मारण्यास आरंभ केला. त्या वेळी त्या तरुणांनी अंगरक्षकांवर गोळीबार केला. पोलिसांनी ४ अज्ञात लोकांवर गुन्हा नोंद केला आहे.