उत्तरदायी साधकांनी भाव असलेल्या साधकांच्या भावजागृतीच्या प्रयत्नांचा आढावा तारतम्याने घ्यावा !
‘काही साधकांची सेवा करतांना किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना आपोआप भावजागृती होते. भाववृद्धी होण्यासाठी त्यांना वेगळे प्रयोग करावे लागत नाहीत. अशा साधकांना उत्तरदायी साधकांनी नेहमीच्या चिंतन सारणीनुसार भावजागृतीचे प्रयत्न करण्यास सांगू नये. (चिंतनसारणी – साधकांच्या व्यष्टी साधनेचा, नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न आदींचा आढावा घेण्यासाठी केलेली सारणी) ज्या साधकांची भावजागृती होत नाही, त्यांना चिंतन सारणीनुसार प्रयत्न करण्याची दिशा द्यावी !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.६.२०२३)