सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत पुष्कळ चैतन्य अनुभवणे
साधकांना सेवेचा माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘माझ्याकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्या खोलीमध्ये जाऊन प्रतिदिन श्री रामरक्षा स्तोत्र आणि ‘श्री हनुमद्वडवानल’ स्तोत्र पठणाची सेवा असते. ही सेवा करण्याच्या काही मिनिटे आधी, पठण करतांना आणि पठण झाल्यावर माझ्या मनाची स्थिती आनंदी असते. ‘परम पूज्य गुरुदेवांच्या खोलीमधील देवघरातील चित्रांत पुष्कळ चैतन्य आहे’, असे मला वाटते.
देवघरातील २ दीपस्तंभ आहेत. त्याचे लोंबत असणारे दीप (पक्षांच्या चोचीमध्ये असलेले) वारा नसला, तरी हलत असल्याचे जाणवते. यावरून ‘तेथे अनेक देवतांची तत्त्वे जागृत असतील’, असे जाणवून ‘खोलीतून बाहेर येतांना एक नवीन उत्साह आणि ऊर्जा घेऊन मी बाहेर पडतो.’ मला ही सेवा करण्यामध्ये आनंद मिळतो. परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेने मनाची स्थिती अनुभवता आली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अरुण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२४.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |