शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !
|
पुणे – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वर्ष २०२१-२२चा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ हा अहवाल घोषित केला आहे. यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी घसरली आहे. याआधी महाराष्ट्र दुसर्या श्रेणीत होता; पण वर्ष २०२१-२२च्या अहवालात महाराष्ट्र यावर्षी सातव्या श्रेणीत गेला आहे. (शिक्षणाचा दर्जा खालावत आहे, हे शिक्षण विभागाच्या लक्षात का आले नाही ? शिक्षण विभागाकडून शिक्षणाच्या दर्जाचे वेळोवेळी अवलोकन केले जात नाही का ? – संपादक) विशेष म्हणजे देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
Maharashtra ranked 7th in Union Education Ministry’s ‘Performance Grading Index’ reporthttps://t.co/flnoIUemmL
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) July 10, 2023
१. ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ या अहवालात शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यात येते. त्यानुसार एकूण ७३ निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. फलनिष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापन या २ गटांत हे निकष विभागण्यात आले, तसेच त्यानंतर त्यांची ६ क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली. अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण, समानता, उपलब्धता आदींचा यात समावेश होता.
२. या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्चित करण्यात आली. या मूल्यमापनामध्ये महाराष्ट्र राज्याला ५८३.२ गुण मिळाले. यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे.
5 districts in #Assam have achieved the highest grade of “Uttam” for the second consecutive year in the Performance Grading Index for Districts (PGI-D) combined report for the academic years 2020-21 and 2021-22 released by the Ministry of Education in India. @EduMinOfIndia pic.twitter.com/KofCmoLFfx
— G Plus (@guwahatiplus) July 10, 2023
संपादकीय भूमिकामॅकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचे फलीत ! भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते ! |