अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामाने पकडली गती !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराच्या उभारणीच्या कामाने गती पकडली असून डिसेंबर २०२३ पर्यंत मंदिराचे गर्भगृह सिद्ध होईल, असे सांगितले जात आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून उभारणीचे काम पाहिले जात आहे. पुढील वर्षीच्या मकरसंक्रांतीच्या जवळपास मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल. मंदिराच्या परिसरात श्री गणेश, सूर्यदेवता, शिव, दुर्गादेवी, अन्नपूर्णा आणि हनुमान या देवतांची देवळेही उभारली जात आहेत.