म्हणे सर्वधर्मसमभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘धर्म’ शब्दाचा अर्थ ठाऊक नसलेलेच ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात ! ‘धर्म’ शब्दाचा अर्थ आहे, जगतः स्थितिकारणं प्राणिनां साक्षात् अभ्युदयनिःश्रेयसहेतुर्यः स धर्मः । – आद्य शंकराचार्य (श्रीमद्भगवद्गीताभाष्याचा उपोद्घात)
अर्थ : सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्यास ‘धर्म’ असे म्हणतात.
असा अर्थ एका तरी धर्मात सांगितलेला आहे का ? तरी अतीशहाणे ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले