मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !
शिमला (हिमाचल प्रदेश) – मौसमी पावसाने उत्तर भारताला चांगलेच झोडपले असून हिमाचल प्रदेशात गेले काही दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे आतापर्यंत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून पाण्याच्या लोंढ्याला लोकांना सामोरे जावे लागले.
#HimachalPradesh has not witnessed such “widespread heavy #rains” in the past 50 years and the state has suffered a loss of about Rs 3,000 crore in this #monsoon season so far, CM Sukhvinder Singh Sukhu said on Monday. https://t.co/t72LXwa1Ri
— Deccan Herald (@DeccanHerald) July 10, 2023
आतापर्यंत १७ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे राज्याला किमान ३ ते ४ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.