बिहारमध्ये कावड यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती
नवी देहली – उत्तर भारतात चालू असलेल्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार बिहारमध्ये कावड यात्रेकरूंच्या वेशात जिहादी आतंकवादी कावड यात्रेवर आक्रमण करू शकतात. यामुळे बिहार पोलिसांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. बिहारमध्ये ४ जुलैपासून कावड यात्रेला प्रारंभ झाला आहे. सध्या या यात्रेला संरक्षण देण्यात आले आहे. आता गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर या यात्रेवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सौजन्य झी न्यूज
संपादकीय भूमिकाहिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे ! |