बोकारो (झारखंड) येथे मशिदीसमोरून हिंदूंना ‘डीजे’ वाजवत नेण्याला मुसलमानांच्या आक्षेपानंतर हाणामारी !
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात !
(डीजे म्हणजे मोठी संगीत यंत्रणा)
बोकारो (झारखंड) – येथे हिंदु कुटुंबियांच्या विवाहाच्या वेळी मशिदीसमोरून डीजे वाजवत जाण्यावरून वाद होऊन हाणामारी झाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला.
‘अजान का समय है, DJ बंद करो और रास्ता बदलो’: मुस्लिमों ने OBC हिन्दू परिवार का शादी कार्यक्रम रोका, पुलिस को आकर कराना पड़ा समझौता#Bokaro #Jharkhandhttps://t.co/uRDxRZTl80
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 10, 2023
येथील संथालडीह गावामध्ये कमल महतो यांच्या घरी विवाहाच्या वेळी एक विधी करण्यात येत होता. या वेळी डीजे वाजवत येथील रस्त्यावरून वरातीप्रमाणे काही महिला आणि पुरुष जात होते. वाटेत मशिदीच्या येथे मुसलमानांनी अजानची वेळ झाल्याचे सांगत डीजे बंद करून दुसर्या मार्गने जाण्यास सांगितले. या वेळी वाद होऊन हाणामारी झाली. काही महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी दोन्ही गटांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांनी येथे अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत.
संपादकीय भूमिका
|