जळगावमध्ये हिंदूंच्या मंदिराला विरोध करत धर्मांधांकडून दंगल !
६ हिंदू घायाळ
जळगाव – येथील सुप्रिम कॉलनी परिसरात हिंदू अगदी छोटेसे (पाच बाय पाच) असे ओंकारेश्वर महादेव मंदिर उभारत आहेत. त्याच्या ओट्याचे बांधकाम चालू असतांना या परिसरातील धर्मांधांनी हिंदूंना विरोध करण्यास आरंभ केला. आरंभी ४० ते ५० धर्मांधांचा जमाव आला. त्यांनी प्रथम वादावादी चालू केली. या वादावादीचे रूपांतर दंगलीत झाले. या वेळी धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. (यावरून ही दंगल पूर्वनियोजित होती, हे सिद्ध होते. – संपादक) त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिले. (हिंदूबहुल भारतात हिंदूंना मंदिर उभारण्यास विरोध करणारे अल्पसंख्यांक ! – संपादक)
धर्मांधांनी केलेल्या या दंगलीत ६ हिंदू घायाळ झाले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
संपादकीय भूमिका
|