अधिक मासातील पूजाविधी
सुगंधी चंदन, अनेक प्रकारची फुले, मिष्टान्न, नैवेद्य, धूप, दीप आदींनी लक्ष्मीसहित भगवान श्रीकृष्ण आणि पितामह भीष्म यांचे पूजन करावे. घंटा, मृदंग आणि शंख यांच्या ध्वनीसहित कापूर अन् चंदन यांनी आरती करावी. हे शक्य नसेल, तर कापसाच्या वातीच्या दिव्याने आरती करावी. यामुळे अनंत फळाची प्राप्ती होते. चंदन, अक्षता आणि फुले यांच्यासह तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन सकाळी पूजेपूर्वी किंवा पूजेनंतर अर्घ्य द्यावे. अर्घ्य देतांना भगवान ब्रह्मदेवासह श्रीकृष्णाचे स्मरण करून प्रार्थना करावी.
अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे. |
(संदर्भ : अज्ञात)