गोवा : अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी संशयिताची न्यायालयाकडून निर्दाेष सुटका
राजपत्रित (गॅझेटेड) अधिकार्यासमोर तपासणी केली जाणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांनी संशयिताला न दिल्याचा पोलिसांवर ठपका
पणजी, ९ जुलै (वार्ता.) – अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित दत्ता पर्वतकर याची निर्दाेष सुटका केली आहे. संशयिताची राजपत्रित (गॅझेटेड) अधिकार्यासमोर तपासणी केली जाणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांनी संशयिताला न दिल्याच्या कारणास्तव न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
COURT ACQUITS ACCUSED IN DRUGS CASE BECAUSE POLICE DIDN’T EXPLAIN ABOUT RIGHT TO BE SEARCHEDhttps://t.co/2xqCE7lUTF pic.twitter.com/mxsH6HHH9Y
— Prudent Media (@prudentgoa) July 7, 2023
१० जानेवारी २०१५ या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाने नवीन मांडवी पुलाजवळ छापा टाकून आल्त पर्वरी येथील संशयित दत्ता पर्वतकर याच्याकडून ०.३ ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेतले होते. पोलिसांनी संशयिताला पूर्वकल्पना न देऊन ‘एन्.डी.पी.एस्’ कायद्याचे कलम ५० चे उल्लंघन केले आहे. यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सुपुर्द केलेल्या पुराव्यावरही संशय निर्माण होत असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
संपादकीय भूमिका
|