मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत. घायाळ व्‍यक्‍तींना शीव रुग्‍णालयात उपचारासाठी नेण्‍यात आले आहे. ९ जुलै या दिवशी सकाळी हा अपघात झाला. ट्रकने ३ दुचाकी आणि एका चारचाकी गाडी यांना धडक दिली. अपघातानंतर चालकाने घटनास्‍थळावरून पलायन केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.