तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन
धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) – ज्यांना तिबेट समस्येच्या निराकरणासाठी मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात, असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
दलाई लामा ने कहा- मैं चीन से बातचीत करने के लिए तैयार हूं, चीन अब बदल रहा है, तिब्बत समस्या के हल के लिए जो मुझसे मिलना चाहते हैं वो आ सकते हैंhttps://t.co/2IlIBjhWAf #DalaiLama
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 8, 2023
दलाई लामा म्हणाले की, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य नको आहे. अनेक वर्षांपूर्वी आम्ही चीनचा एक भाग रहाण्याचा निर्णय घेतला होता. आता तर चीनलाही कळून चुकले आहे की, तिबेटी लोकांची भावना पुष्कळ भक्कम आहे. मी कुणावरही अप्रसन्न नाही. तिबेटविषयी कठोर वृत्ती स्वीकारलेल्या चिनी नेत्यांवरही नाही. चीन ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध देश आहे. मी चीनला भेट दिली, तेव्हा तिथे अनेक मंदिरे आणि मठ पाहिले.