हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्थान) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा
देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहलीतील कालकाजीमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर (सनातन धर्म मंदिर), नोएडा (उत्तरप्रदेश) येथील सेक्टर ५६ मधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री सनातन धर्म मंदिर सभा आणि भिलवाडा (राजस्थान) येथील भारत विकास परिषदेची इमारत येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करण्यात आले. देहली येथे हिंंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी, नोएडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नोएडा संपर्क प्रमुख सुुरेंद्र सिंह चौहान अन् हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी, फरीदाबाद येथे लेखक आणि प्रकाशक मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त) आणि समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी, तर भिलवाडा येथे भारत विकास परिषदेचे राजस्थान-मध्यप्रदेश अध्यक्ष श्री. गोविंद प्रसाद सोडानी अन् समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी मार्गदर्शन केले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यास पूजन आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना अध्यात्माचे महत्त्व सांगणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली.
हिंदूंच्या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय !- अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
आज संपूर्ण सनातन हिंदु समाज लव्ह जिहाद, गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण, वक्फ कायदा, प्रार्थनास्थळे कायदा, हलाल प्रमाणपत्र अशा सहस्रो समस्यांमधून जात आहे. त्यासाठी या देशाला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राकडे घेऊन जाणे, हाच एकमेव उपाय आहे आणि त्याचा पाया लवकरात लवकर घातला जाणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी देहली येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदु विवाह कायदा १९५५ सिद्ध करण्यापूर्वी आणि कार्यवाहीत आणण्यापूर्वी हिंदु धर्मगुरु, शंकराचार्य आणि संत यांच्याशी चर्चा झाली नाही; परंतु आज विधी आयोग समान नागरी कायद्यासाठी समाजाकडून सूचना मागत आहे.’’
आपण धर्मरक्षणासाठी कटीबद्ध होऊया ! – सुरेंद्र सिंह चौहान, संपर्क प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नोएडा
सध्या सर्वत्र हिंदु धर्मावरील आक्रमणे वाढली आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी धर्महिताचे काम करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण धर्मरक्षणासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प करूया.
हिंदु मुलींमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी संवेदनशीलता निर्माण होणे आवश्यक ! – मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त), लेखक आणि प्रकाशक
आज समाजात अनेक वाईट गोष्ट आहेत. ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर समस्येविषयी हिंदु मुलींमध्ये संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. त्याविषयी आपल्या मुलांना जागृत करण्याची आवश्यकता आहे. जेवणाच्या वेळी आपल्या मुलांसमवेत बसा आणि त्यांच्याशी धर्मावर चर्चा करून त्यांना घडवा. त्यांना असामाजिक तत्त्वांच्या षड्यंत्रांविषयी जागृत करा. आपली प्रत्येक कृती मुले आणि समाज यांना प्रेरणा देते. त्यामुळे आज हिंदु समाजाला अधिकाधिक जागरूक करण्याची आवश्यकता आहे.
हिंदु संस्कृती आत्मसात केली, तर स्वतःचे जीवन सार्थकी लागेल ! – गोविंद प्रसाद सोडानी, राजस्थान-मध्यप्रदेश अध्यक्ष, भारत विकास परिषद
आपण आपली हिंदु संस्कृती आत्मसात केली, तर स्वतःचे जीवन सार्थकी लागेल. संस्कृतीचे पालन केल्याने आपल्याला निश्चित ऊर्जा मिळते. गाय, तुळशी आणि मंदिर यांना प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. आजही ही ऊर्जा आधुनिक यंत्राद्वारे मोजली जाऊ शकते. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीची ही वैज्ञानिकता समजून घेऊन ती स्वीकारली पाहिजे. आपल्या मातृभाषेवर घाला घालणार्या अनेक शब्दांचा वापर प्रयत्नपूर्वक थांबवावा लागेल. हिंदु जनजागृती समिती ज्ञानदान करत आहे. त्यांचे कार्यकर्ते आपला वेळ देत आहेत. अशा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणही योगदान दिले पाहजे.
विशेष उपस्थिती
१. देहली येथील कार्यक्रमाला अधिवक्ता रविशंकर उपस्थित होते.
२. नोएडा येथील कार्यक्रमात सनातनचे पू. संजीव कुमार, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मित्तल, अधिवक्ता बिपिन बिहारी सिंह, श्री. राम शरण गौर, श्री. अजयजी, सुनीता दुर्राणी आणि लक्ष्मीनारायण मंदिर समितीचे श्री. ओ.पी. गोयल उपस्थित होते.
३. फरीदाबाद येथील कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या पू. (सौ.) माला कुमार यांची वंदनीय लाभली. यासह ‘एन्.आय.टी., फरीदाबाद’चे सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय महेंद्रू उपस्थित होते.
क्षणचित्रे
देहली येथील कार्यक्रमामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेजीकी साधकोंको अनुभव हुई विशेषताएं !’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
संपर्क : ९३२२३१५३१७