तापातून लवकर बरे होण्यासाठी हे करावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१२
१. ‘भूक नसल्यास काही न खाता उपवास करावा. (मधुमेहाच्या रुग्णांनी उपवासाच्या वेळी मधुमेहाची औषधे घेऊ नयेत.)
२. तहान लागल्यास सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळलेले पाणी गरम किंवा कोमट थोडे थोडे प्यावे. यासाठी १ लिटर पाण्यामागे अर्धा चमचा मुस्ता चूर्ण वापरावे.
३. भूक लागल्यावर नेहमीचा आहार न घेता मूगडाळीचे वरण किंवा कढण गरम असतांना प्यावे. (‘कढण’ म्हणजे ‘मूगडाळ शिजवून तिच्यात चवीपुरते मीठ आणि गूळ घालून बनवलेला पातळ पदार्थ.’) १ – २ दिवस असा आहार घेऊन ताप कमी होऊन बरे वाटू लागल्यावर हळूहळू नेहमीचे जेवण चालू करावे.
४. ताप असतांना आपोआप उलटी झाल्यास लगेच उलटी थांबवण्याचे औषध घेऊ नये. तापामध्ये आपणहून एखाददुसरी उलटी झाल्यास ताप लवकर बरा होतो. (स्वतः मुद्दामहून उलटी करणे टाळावे.)’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |