प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील महालक्ष्मी अम्मण्णी महिला महाविद्यालयात ‘प्रेस डे’, तसेच ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. या वेळी ‘कर्नाटक डिजिटल मिडिया असोसिएशन’चे उद्घाटन राज्यसभा खासदार जी.सी. चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आले. अबलाश्रमाच्या अध्यक्षा आणि किद्वायी चिकित्सालयाच्या माजी निर्देशिका प्रसिद्ध आधुनिक वैद्या डॉ. विजयलक्ष्मी देशमने, दैनिक ‘विजय कर्नाटक’चे प्रसाद नायडू, ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीचे डॉ. भास्कर हेगडे आणि अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय शाकाहारी शरीर सौष्ठवपटू आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.