कर्तेपणा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

१. आवाजातील माधुर्य

कु. श्रिया राजंदेकर

‘कु. श्रिया हिच्‍याशी बोलतांना मला नेहमी आनंद जाणवतो. तिच्‍या बोलण्‍यात गोडवा आहे. ‘ती बोलतांना मोती उधळत आहे’, असे मला वाटते.

२. इतरांचा विचार करणे

एकदा पू. जलतारेआजी (माझी मोठी बहीण आणि श्रियाच्‍या आतेआजी, सनातनच्‍या ९५ व्‍या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी) श्रियाकडे रहायला आल्‍या होत्‍या. तेव्‍हा श्रियाने पू. आजींना माझ्‍याशी बोलण्‍यासाठी भ्रमणभाष लावून दिला. आम्‍ही बोलत असतांना पू. आजींना मध्‍येच खोकल्‍याची उबळ आली. तेव्‍हा श्रियाने लगेच पू. आजींकडून भ्रमणभाष संच स्‍वतःच्‍या हातात घेतला आणि ती मला म्‍हणाली, ‘‘आजोबा, पू. आजींना पुष्‍कळ बोलल्‍यास त्रास होतो. मी तुम्‍हाला थोड्या वेळाने जोडून देते.’’

श्री. श्याम राजंदेकर

३. प्रत्‍येक साधकात गुरुरूप पहाणे

अ. एकदा पू. वामन (श्रियाचे लहान भाऊ, सनातनचे दुसरे बालसंत) यांनी श्रियाला ‘ज्‍या ज्‍या ठिकाणी मन जाय माझे । त्‍या त्‍या ठिकाणी निज रूप तुझे ।…..’, हा श्‍लोक म्‍हणून दाखवला. तेव्‍हा श्रियाने या श्‍लोकाच्‍या अर्थानुसार कृती करण्‍याचे ध्‍येेय घेतले.

आ. श्रियाला प्रत्‍येक साधकाशी बोलतांना आनंद होतो. याविषयी तिला विचारल्‍यावर ती म्‍हणाली, ‘‘प्रत्‍येक साधकामध्‍ये प.पू. डॉक्‍टर आहेत; म्‍हणून मला साधकांशी बोलतांना आनंद होतो.’’

४. कर्तेपणा प.पू. डॉक्‍टरांच्‍या चरणी अर्पण करणे

एकदा तिच्‍याशी भ्रमणभाषवरून बोलतांना मी तिच्‍यातील गुणांचे कौतुक केले. तेव्‍हा ती लगेच मला म्‍हणाली, ‘‘हे सर्व प.पू डॉक्‍टरांनीच आपल्‍याला दिले आहे. त्‍यांनी सर्वांनाच गुण वाटून दिले आहेत. त्‍यांनी मला काही गुण दिले आणि तुम्‍हाला काही गुण दिले. त्‍यांनी दिलेल्‍या गुणांची वृद्धी करण्‍याचा मी प्रयत्न करते.’’

– श्री. श्‍याम राजंदेकर (कु. श्रियाचे आजोबा, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७७ वर्षे), अकोला (१४.४.२०२३)