उत्तरदायी साधकांनी ‘चांगली सेवा करणार्या साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, याकडे लक्ष द्यावे !
‘एका जिल्ह्यातील एक साधक सेवा चांगली करायचे; परंतु स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे अन्य साधकांनी सांगितलेल्या चुका त्यांना स्वीकारता यायच्या नाहीत. ‘अन्य साधकांनीच प्रयत्न करायला हवेत’, असे त्यांना वाटायचे.
उत्तरदायी साधकांनी सत्संगात त्या साधकाला स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, ‘मी इतरांकडे बहिर्मुखतेने न पहाता साधना करून स्वतःमध्येच पालट करायचे आहेत.’ ही जाणीव निर्माण होऊन प्रयत्न करू लागल्यावर त्यांना चुकाची खंत वाटू लागली.
हे उदाहरण लक्षात ठेवून उत्तरदायी साधकांनी ‘चांगली सेवा करणार्या साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही होत आहेत ना ?’, याकडे लक्ष द्यावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.६.२०२३)