सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘भ्रष्टाचार नाही’, असे एकही क्षेत्र नाही. सदनिका घ्यायची असली, तरी रोख (काळा पैसा) आणि धनादेश यांद्वारे रक्कम द्यावी लागते. सदनिका विकणार्यांकडे खोटे गिर्हाईक म्हणून सरकार कुणाला का पाठवत नाही ? सदनिका विकणार्या ५-१० जणांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली की, सर्वच सदनिका-विक्रेते काळ्या पैशांतील व्यवहार तात्काळ थांबवतील. अशाच तर्हेने सर्वच क्षेत्रांतील आणि सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार रोखता येईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले