बांगलादेश कुठल्याही देशाच्या अधीन नाही !

बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्पष्टोक्ती

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए.क. अब्दुल मोमेन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश कुठल्याही देशाच्या अधीन नाही, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए.क. अब्दुल मोमेन यांनी केले आहेत. ‘आमच्या देशाचा ओढा कधी चीनकडे राहिलेला नाही; कारण आम्ही समतोल आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवतो’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

डॉ. मोमेन यांनी भारताविषयी म्हटले की, भारत आमचा जवळचा शेजारी आहे आणि त्याच्याशी आमचे संबंध भक्कम आहेत. काही जण विचार करतात की, आम्ही चीनच्या दिशेने झुकलो आहोत; मात्र हे चुकीचे आहे. चीन केवळ आमच्या विकासातील एक भागीदार आहे.

संपादकीय भूमिका

चीनकडे ओढा नसल्याचेही केले स्पष्ट !