महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !
मुंबई – राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या महापुरुषांच्या गावांतील शाळांचा महाराष्ट्र शासनाकडून विकास करण्यात येणार आहे. यांतील काही शाळांमध्ये या महापुरुषांनी शिक्षण घेतले आहे. राज्यातील अशा १३ ऐतिहासिक गावांतील शाळांची शासनाने निवड केली आहे. या शाळांमध्ये संबंधित राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती सांगणारी संग्रहालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शासनाने घोषित केला आहे.
अहिल्याबाई होळकर नगरमधील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा, अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा शाळा, तर शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख शाळा; कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शाळा, नाशिक येथील कवी कुसुमाग्रज शाळा; सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि सावित्रीबाई फुले शाळा; पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळा; रत्नागिरी येथील महर्षी धोंडो केशव कर्वे आणि सानेगुरुजी शाळा; सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीसिंह नाना पाटील शाळा यांचा विकास करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाराज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा ! |