शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ अज्ञातांनी टाकले गोमांस !
|
शाहजहापूर (उत्तरप्रदेश) – येथील मोहल्ला कच्चा कटरा तिठा येथील हनुमान मंदिराच्या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यानंतर त्यांनी येथे रस्ता बंद करून निदर्शने केली. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या तिठ्याच्या ठिकाणी नेहमीच पोलीस बंदोबस्त असतो. तरीही अज्ञातांनी गोमांस फेकल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी राजेश अवस्थी यांनी म्हटले की, अशी घटना सहन केली जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणा केला आहे.
बोरी में मांस भर कर हनुमान मंदिर के पास फेंका, हिन्दू संगठनों का प्रदर्शन: अपराधियों को दबोचने के लिए यूपी पुलिस ने बनाई 3 टीमें#UP #hindutemplehttps://t.co/ayUwGN6cbl
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 8, 2023
संपादकीय भूमिका
|