आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला प्रसाद लाडू, परिवार देवता, ऑनलाईन देणगी, सोने आणि भक्तनिवास या माध्यमांतून ६ कोटी २७ लाख ६० सहस्र रुपयांचे आर्थिक उत्पन्न लाभले आहे. गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत हे उत्पन्न ५७ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.