सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांची वर्ष २०२२ आणि २०२३ मधील मांडणी, तसेच देवघराच्या प्रत्येक खणातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे अन् त्याचे प्रमाण निरनिराळे असणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वी एका लाकडी कपाटात त्यांचे देवघर बनवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांच्या देवघरातील देवतांची अनेक वर्षे मनोभावे पूजा केली. आता वयोमानामुळे आणि प्राणशक्ती अल्प असल्याने त्यांना देवपूजा करणे शक्य होत नाही. त्यामुळे सनातनच्या साधिका किंवा साधक त्यांच्या देवघरातील देवतांचे पूजन करतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील प्रत्येक खणातून (देवघराच्या लाकडी कपाटात एकूण ३ खण आहेत.) पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि त्याचे प्रमाण निरनिराळे आहे. वर्ष २०२२ मध्ये देवघराच्या संदर्भात संशोधन करण्यात आले होते. (वर्ष २०२३ मध्ये देवघरातील देवतांच्या मांडणीत (रचनेत) थोडे पालट करण्यात आले. याची माहिती लेखात दिली आहे.) वर्ष २०२३ मध्ये हनुमान जयंतीला देवघरातून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. यासंदर्भात संशोधन करण्यासाठी देवघराची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांची वर्ष २०२२ मधील मांडणी (रचना)
१ अ. देवघराचा १ ला खण : या खणात डावीकडून १. नागदेवतेची मूर्ती, २. दत्ताचे सनातन-निर्मित चित्र आणि ३. सूर्याची प्रतिमा ठेवले होते. या खणात दोन्ही बाजूंना १-१ लामण दिवा ठेवला होता.
१ आ. देवघराचा २ रा खण : या खणात डावीकडून ४. श्रीकृष्ण आणि ५. श्रीराम यांची सनातन-निर्मित चित्रे, मधोमध ६. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि उजवीकडे ७. वाघावर बसलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र अन् ८. श्री दुर्गादेवीचे सनातन-निर्मित चित्र ठेवले होते. या चित्रांच्या पुढ्यात डावीकडून ९. श्रीविष्णूचे चित्र, १०. श्रीरामपंचायतनाचे छोटे चित्र, ११. लहान आकाराच्या चांदीच्या पादुका, मधोमध १२. दत्ताची मूर्ती, १३. बाळकृष्णाची मूर्ती, १४. श्रीलक्ष्मीदेवीची मूर्ती आणि १५. श्रीवाराहीदेवीचे चित्र ठेवले होते.
१ इ. देवघराचा ३ रा खण : या खणात डावीकडून १६. मारुति, १७. शिव, मधोमध १८. श्री गणपति आणि उजवीकडे १९. श्रीलक्ष्मीदेवी अन् २०. श्री सरस्वतीदेवी यांची सनातन-निर्मित चित्रे ठेवली होती. या चित्रांच्या पुढ्यात डावीकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुलदेवता २१. श्री व्याडेश्वर अन् श्री योगेश्वरीदेवी यांची प्रतिमा, २२. श्री गणपतीची पंचधातूची मूर्ती, २३. श्री गणपतीची चांदीची प्रतिमा, घंटा, शंख आणि उजवीकडे २४. कुबेर अन् २५. श्रीविष्णु यांच्या मूर्ती ठेवल्या होत्या.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांची वर्ष २०२३ मधील मांडणी (रचना)
२ अ. देवघराचा १ ला खण : या खणात डावीकडून १. नागदेवतेची मूर्ती, २. गरुडदेवतेची मूर्ती आणि ३. सूर्याची प्रतिमा ठेवली आहे.
२ आ. देवघराचा २ रा खण : या खणात डावीकडून ४. श्री वाराहीदेवीचे चित्र, ५. मारुति आणि ६. श्रीराम यांची सनातन-निर्मित चित्रे, मधोमध ७. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि उजवीकडे ८. श्रीकृष्ण, ९. शिव, १०. श्रीविष्णु यांची सनातन-निर्मित चित्रे आहेत. या चित्रांच्या पुढ्यात आपल्या डावीकडून ११. श्रीरामपंचायतनाचे चित्र, घंटा, १२. लहान आकाराच्या चांदीच्या पादुका, शंख आणि १३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुलदेवता श्री व्याडेश्वर अन् श्री योगेश्वरीदेवी यांची प्रतिमा आहे.
२ इ. देवघराचा ३ रा खण : या खणात डावीकडून १४. दत्त, १५. श्री सरस्वतीदेवी आणि १६. श्रीलक्ष्मीदेवी, मधोमध १७. श्री गणपति आणि उजवीकडे १८. श्री दुर्गादेवी यांची सनातन-निर्मित चित्रे अन् १९. वाघावर बसलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र आहे. या चित्रांच्या पुढ्यात डावीकडून २०. दत्ताची मूर्ती, २१. श्रीलक्ष्मीदेवीची मूर्ती, २२. श्री गणपतीची पंचधातूची मूर्ती, मधोमध २३. बाळकृष्णाची मूर्ती आणि उजवीकडे २४. श्री गणपतीची चांदीची प्रतिमा, २५. कुबेराची मूर्ती आणि २६. श्रीविष्णूची मूर्ती आहेत.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघराच्या प्रत्येक खणातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे
देवघराच्या प्रत्येक खणातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि त्याचे प्रमाण निरनिराळे आहे. मागील वर्षीच्या (वर्ष २०२२ च्या) तुलनेत यावर्षी (२०२३ मध्ये) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले. पुढील सारणी पहा.
टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे घटकांतील सकारात्मक ऊर्जा मोजतांना काही घटकांची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती अचूक मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अचूक मोजण्यासाठी ‘लोलका ’चा उपयोग करण्यात आला.
३ अ. देवघरातील ३ र्या खणामध्ये अधिक प्रमाणात शक्ती जाणवणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितले की, ‘देवघरातील ३ र्या खणामध्ये अधिक प्रमाणात शक्ती जाणवते. या खणातील श्री गणपतीच्या चित्रासमोर उभे राहिल्यावर व्यक्तीला मागे ढकलल्यासारखे होते.’ याचे कारण हे की, श्री गणपतीच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.
श्री गणपतीच्या दोन्ही बाजूला शक्तीस्वरूपा देवींची चित्रे आहेत, तसेच या खणात गणपतीची चांदीची प्रतिमा अन् पंचधातूची मूर्ती सुद्धा आहे. एकंदरीतच देवघरातील ३ र्या खणातून प्रक्षेपित होत असलेल्या शक्तीच्या स्पंदनांमुळे व्यक्तीला मागे ढकलल्यासारखे होते.
३ आ. देवघरातील २ र्या खणातून चैतन्य अन् आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : देवघरातील २ र्या खणात शिष्य डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे. तसेच श्रीकृष्ण, शिव, श्रीविष्णु या देवतांची चित्रे आहेत. शिष्य डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीगुरूंप्रती उच्चकोटीचा िशष्यभाव आहे. त्यांच्यातील अनन्य गुरुभक्तीमुळे त्यांच्या देवघरात ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात चैतन्य अन् आनंद यांची स्पंदने निर्माण झाली आहेत. यामुळे २ र्या खणाकडे पाहून चैतन्य अन् आनंदाची, तर ३ र्या खणाकडे पाहून शक्तीची अनुभूती येते. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने उत्तरोत्तर अधिक सूक्ष्म असल्याने अधिक प्रभावी आहेत.
३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील देवतांच्या मूर्ती, प्रतिमा आणि चित्रे यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असणे अन् त्यांचे प्रमाण निरनिराळे असणे, यामागील कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापनेचे (ईश्वरी राज्याच्या स्थापेनचे) महान कार्य करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना महर्षींनी, तसेच काही संतांनी देवतांच्या काही मूर्ती, प्रतिमा आदी दिल्या आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अत्यंत भक्तीभावाने या मूर्ती अन् प्रतिमा त्यांच्या देवघरात ठेवल्या आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवीदेवता त्यांना साहाय्य करतात. या कार्यासाठी काळानुरूप देवतांची तत्त्वे (म्हणजे त्या त्या देवतेतील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने) ज्या प्रमाणात कार्यरत असतात, त्यानुसार देवतांच्या मूर्ती किंवा चित्रात ती प्रतिबिंबित होतात, उदा. यावर्षी हनुमान जयंतीला देवतांच्या मूर्ती, प्रतिमा अन् चित्रे यांच्यातील शक्तीची स्पंदने पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षी देवघरात श्री गरुडाची मूर्ती नव्हती; पण पुढे महर्षींनी गरुडयज्ञाच्या निमित्ताने गरुडाची सुंदर लाकडी मूर्ती दिली. ‘गरुड श्रीविष्णूचे वाहन आहे. या मूर्तीच्या रूपाने श्री गरुडदेव श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना त्यांच्या कार्यात साहाय्य करायला आले’, असे जाणवले.
४. देवघरातील देवतांच्या मूर्ती, प्रतिमा आणि चित्रे यांना फुले वाहिल्यावर त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होणे
देवतांना फुले अर्पण करणे हा पंचोपचार पूजनातील एक उपचार आहे. देवतांना फुले वाहिल्यावर देवतांचे चैतन्य (तत्त्व) त्यांच्या मूर्ती किंवा चित्रे यांमध्ये सहजतेने आकृष्ट होऊन कार्यरत होते. साधिकेने देवघरातील देवतांना फुले वाहिल्यावर तिच्यातील भावामुळे देवतांच्या मूर्ती, प्रतिमा आणि चित्रे यांच्यातील चैतन्य कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढील सारणीतून दिसून आले.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरात सायंकाळीही पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे
‘सकाळी देवपूजा झाल्यावर देवघरात जाणवणारी शक्ती (चैतन्य) सायंकाळीही जाणवते का ?’, हे अभ्यासण्यासाठी देवघराची आणि त्यातील तिन्ही खणांची सायंकाळी छायाचित्रे काढून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.
यातून लक्षात आले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरात सायंकाळीही पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे, विशेष म्हणजे त्यात वाढ झाली आहे. याचे कारण हे की, सामान्य व्यक्तीच्या देवघरातील चैतन्य तिच्या कुटुंबापुरते मर्यादित असते; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील चैतन्य समस्त सृष्टीला चैतन्य प्रदान करते. सूर्यास्तानंतरचे वातावरण हे वाईट (त्रासदायक) शक्तींना पोषक ठरत असल्याने त्यांचा जोर वाढतो. त्यामुळे वाईट शक्तींची समष्टीवरील आक्रमणे वाढतात. यांपासून समष्टीचे रक्षण करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील चैतन्य कार्यरत होते.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघराचा त्यांच्या स्वतःवर आणि खोलीवर सकारात्मक परिणाम होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघराचा त्यांच्या स्वतःवर आणि खोलीवर काय परिणाम झाला ?’, हे अभ्यासण्यासाठी सायंकाळी त्यांची छायाचित्रे काढून चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत. तुलनेसाठी म्हणून मागील वर्षीच्या नोंदी दिल्या आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ असामान्य आणि अद्वितीय आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे त्यांची खोलीही उच्च सकारात्मक स्पंदनांनी भारित झाली आहे. समस्त सृष्टीला चैतन्य प्रदान करणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघराशी संबंधित संशोधनाच्या सेवेत आम्हा साधकांना सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.५.२०२३)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
(वर्ष २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये देवघरातील मूर्ती, प्रतिमा आणि चित्रे यांच्यातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. याचे संशोधन निराळ्या लेखात देण्यात येणार आहे.)