हत्यारांसह छायाचित्र प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेवर गुन्हा नोंद !

मुलगा सोहेलवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे उघड

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – कोयता, चाकू, छर्‍याची बंदूक, हॉकी स्टिकसमवेत ‘व्हिडिओ’ सिद्ध करून सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करणार्‍या आयेशा परवीन सरवर (वय ४६ वर्षे) या महिलेवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. आयेशा परवीन ही गृहिणी असून ती ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर सक्रिय असते. किराडपुरा येथील दंगलीमुळे सामाजिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सिद्ध करण्यात आली आहेत. (आतापर्यंत तलवारीने केक कापला; म्हणून अनेक धर्मांधांवर गुन्हे नोंद झाले आहेत; मात्र कुणावरही कठोर कारवाई न झाल्याने हत्यारांसह छायाचित्र प्रसारित करण्याची हिंमत धर्मांध महिलेने केली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)

जवाहरनगरचे पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी महिलेचे ‘इन्स्टाग्राम’ खाते पडताळले असता त्यावर महिलेचे शस्त्रासह छायाचित्र आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित महिलेचा शोध घेत सर्व शस्त्रे जप्त केली. पोलिसांनी आयेशाची चौकशी केली असता तिचा मुलगा सोहेल सरवरने ही हत्यारे आणल्याचे सांगितले. सोहेलवर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका :

धर्मांध महिला गुन्हेगारीमध्ये अग्रेसर असणे देशासाठी धोकादायक आहे ! ही स्थिती वाढण्याअगोदरच धर्मांधांच्या मुसक्या आवळणे अपरिहार्य आहे !