मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चा नामफलक हटवा !
विश्व हिंदु परिषदेची मागणी !
ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – मीरा रोड येथील नयानगर भागातील एका चौकाचे वर्ष २०१६ मध्ये ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. ‘टिपू सुलतान’ हे नाव पालटण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आली आहे. (धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणार्या विश्व हिंदु परिषदेचे अभिनंदन ! – संपादक) याविषयी स्थानिक नागरिकांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. (नागरिकांना हे का सांगावे लागते ? प्रशासनाला हे लक्षात येत नाही का ? – संपादक) ‘हा नामफलक येत्या १० दिवसांत न पालटल्यास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :
|