ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !
ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – ठाणे येथून बोरिवलीला जाणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) बसला येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर ८ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्या दोघांच्या पायांना दुखापत झालेली आहे, तर इतर प्रवासी सुखरूप आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.