बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज यांची हत्या
|
बेळगाव – येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. आता त्यांचा मृतदेह सापडला आहे. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Prominent Karnataka Jain monk Muni Kamkumar Nandi Maharaj murdered: Report – @thenileshdesai – #TheHinduPatrika #Latest #News https://t.co/2GQzYcogX4
— The Hindu Patrika #News (@thehindupatrika) July 8, 2023
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रममध्ये आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या १५ वर्षांपासून रहात होते. आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगारे यांनी कामकुमार नंदी महाराज बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.
कर्नाटक में जैन मुनि की हत्या, शव काट कर टुकड़े-टुकड़े किए फिर फेंक दिया: अब तक नहीं खोज पाई पुलिस, 15 वर्षों से आश्रम में रह रहे थे#Karnataka #JainMonk #Murderhttps://t.co/RTGtT0nYv1
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 8, 2023
पोलिसांनी संशयावरून २ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली असतांनाच मुनी यांची हत्या करून फेकलेला मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. कह्यात घेतलेल्या दोघांनी मुनींचे अपहरण करून हत्या केल्याचे नंतर चौकशीच्या वेळी मान्य केले.