पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे तक्रार !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
नेल्लोर (आंध्रप्रदेश) – येथे २ जुलै या दिवशी मुसलमानांनी समान नागरी कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला होता. या वेळी एका मौलानाने (इस्लामच्या अभ्यासकाने) पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ठार मारण्याचे आवाहन केले होते. तसेच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी मौलानावर चिखावणीखोर विधाने केल्यावरून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ७ जुलै या दिवशी भाग्यनगर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तक्रार करण्यात आली. या वेळी एकता मंच, बजरंग सेना, भावसार क्षत्रिय समाज आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
@PMOIndia @HMOIndia @ap_state_police @NIA_India This man from Andhra Pradesh is openly instigating people to harm and kill PM and Home Minister. Such elements need to be dealt with ruthlessness and with an iron fist. Else such provocation can lead to law and order problems. pic.twitter.com/nDRAJR3aDl
— karthik boggarapu (@KarthikBogg) July 4, 2023
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ? |