देशातील ७ राज्यांत पूरसदृश परिस्थिती !
|
नवी देहली – देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे.
देश के 7 राज्यों में बाढ़ जैसे हालात: कर्नाटक में 4 की मौत; उत्तराखंड में 154 सड़कें बंद, अगले तीन दिन 24 राज्यों में भारी बारिश का अलर्ट#WeatherForecast #Rainfall #Monsoon https://t.co/EEbLbuU18H pic.twitter.com/5dd7bW72D9
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 8, 2023
कर्नाटकात पावसामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये १५४ रस्ते बंद करण्यात आले आहेत. आसाममधील ६ जिल्ह्यांतील १२१ गावांतील अनुमाने २२ सहस्र लोकांना पुराचा फटका बसला आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर छिन्काजवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.
देश के 7 राज्यों में तेज बारिश के चलते बाढ़ जैसे हालात बन चुके हैं। इसमें असम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरल, तटवर्ती गोवा-कर्नाटक और नगालैंड के कई इलाके पानी में डूब गए। #WeatherUpdate #monsoon #Rainfall
पढ़ें पूरी खबर- https://t.co/EEbLbuTtj9 pic.twitter.com/i4832Iamwl
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 8, 2023
साधारण ५ घंट्यांतर तो चालू करण्यात आला. पुढील ४ ते ५ दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदात भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह ९ जुलैपर्यंत जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.