परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती
सर्व साधकांवर कृपादृष्टी असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. रथोत्सवाच्या आधी सराव करतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘रथोत्सवाच्या आधी हातात ध्वज घेऊन चालण्याचा सराव करत असतांना मला सूक्ष्मातून शेषशायी श्रीविष्णूचे अस्तित्व जाणवत होते.
आ. ‘श्रीविष्णु सराव पहात आहे’, असे मला दिसत होते. त्यामुळे माझा भाव जागृत होत होता.
इ. सराव करतांना मला वाटायचे, ‘माझ्याकडून प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असा सराव व्हायला हवा, तसेच प्रत्यक्ष दिंडी भावपूर्ण आणि परिपूर्ण व्हायला हवी. आम्हा साधकांकडून सर्व कृती भावपूर्ण व्हायला हव्यात.’ माझ्याकडून त्यासाठी प्रार्थनाही व्हायच्या.
२. रथोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती
रथोत्सवाच्या दिवशी आश्रमातील एका ठिकाणाहून खाली उतरत असतांना मला जाणवले,
अ. ‘मी खरोखरच वैकुंठ लोकातून पृथ्वीवर जात आहे.
आ. बाजूला उभे असलेले साधक वैकुंठ लोकातील देवगण आहेत.
इ. श्रीविष्णु पृथ्वीवर जात असल्याने साधकांना त्याचा विरह सहन न होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात आहेत.’
३. जन्मोत्सवानंतर माझ्या उत्साहात वाढ झाली.’
– सुश्री (कु.) राजश्री मामलेदार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)
|