परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि अनन्य भोळा अन् उत्कट भाव असलेल्या पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !
पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.
५ जुलै या दिवशी ‘पू. (सौ.) शालिनी मराठे यांचा जन्म, बालपण, शिक्षण, विवाह आणि सनातन संस्थेशी झालेला संपर्क’ हा भाग पाहिला. आजच्या भागात त्यांना विविध ठिकाणी करता आलेले देवदर्शन, प.पू. भक्तराज महाराज यांचा पहाता आलेला अनुपम अमृत महोत्सव आणि त्यांनी आरंभीपासून केलेल्या सेवा दिल्या आहेत.
११. प.पू. डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी साधिकेच्या पाळे, शिरदोन येथील घरी दिलेली भेट !
‘पूर्वी पणजी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये सनातनचा सत्संग चालू होता. पणजी आणि जवळपासचे साधक तिथे यायचे. आम्हीही तिकडेच सत्संगाला जात होतो. एका शनिवारी फोंडा येथे अभ्यासवर्ग झाल्यानंतर दुसर्या दिवशी प.पू. डॉक्टर, डॉ. (सौ.) कुंदा आठवले, डॉ. पांडुरंग मराठे, सौ. मंगला मराठे, आधुनिक वैद्या रूपाली भाटकर आणि श्री. अभय वर्तक हे सर्व जण पाळे, शिरदोन येथील आमच्या घरी आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘या परिसरात सनातनचे पुष्कळ सत्संग होतील.’’ प.पू. डॉक्टरांचा संकल्प आणि कृपा यांमुळे पाळे, शिरदोन, नावशी, बांबोळी, वडवड, पिलाट, सुळाभाट, कुडकाय, नेवरा, डोंगरी, आजोशी इत्यादी ठिकाणी सनातनचे सत्संग चालू झाले.
१२. इंदूर येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांची पाद्यपूजा करण्याची अनमोल संधी मिळणे आणि त्यांच्या कृपेने तेथील धार्मिक स्थळांचे दर्शन होणे
मे १९९३ मध्ये आमच्या मनात ‘सुट्टी घेऊन काशीयात्रा करावी’, असे होते; पण प.पू. डॉक्टरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘भक्तवात्सल्याश्रम’ येथे ७ – ८ दिवस राहिलो. तेव्हा आमची प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट होऊन आम्हाला त्यांची पाद्यपूजाही करता आली. प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून आम्हाला नर्मदेश्वराचे आणि नर्मदेश्वराजवळ असलेल्या ‘श्यामसाई’ अन् ‘अनंतानंद साईश’ यांच्या आश्रमांचेही दर्शन घडवले. महाराजांच्या सेवकाने आम्हाला उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे दाखवली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात आम्हाला प.पू. धांडे महाराज यांचे दर्शन झाले. प.पू. रामानंद महाराज यांनी आम्हाला सर्वतोपरी साहाय्य केले. प.पू. भक्तराज महाराज यांनी आम्हाला पुढे रामनाथ देवस्थान (गोवा) येथे होणार्या गुरुपौर्णिमेविषयी विचारले.
१३. इंदूर येथे झालेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवात आम्हा कुटुंबियांना सहभागी होता येणे
२.२.१९९५ या दिवशी आम्ही तिघे (मी, यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे (सनातनच्या २१ व्या (व्यष्टी) संत) यांनी) प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी इंदूर येथे गेलो. तेव्हा आम्ही गोव्यातील काही साधकांच्या समवेत प्रथमच बसने मुंबई ते इंदूर असा जाता-येता प्रवास केला. प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि भावपूर्ण वातावरणात झाला. त्या अमृत महोत्सवाचे पूर्ण नियोजन प.पू. डॉक्टरांनी केले होते. तेव्हा तो संपूर्ण परिसर ‘भूवैकुंठच’ आहे’, असे आम्हा सर्व साधकांना वाटत होते. मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या फेरीमध्ये सहभागी होता आले. अमृत महोत्सवाचा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यति ।’, असा झाला.
१४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या होणार्या गुरुपौर्णिमा आणि सनातन संस्थेच्या वतीने होणारे विविध सत्संग यांना उपस्थित रहाता येणे
१४ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या होणार्या गुरुपौर्णिमांमध्ये सहभागी होता येणे : वर्ष १९९३ मध्ये रामनाथ देवस्थान (गोवा) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमेत आम्हाला सहभागी होता आले. तिथे आम्हाला प.पू. भक्तराज महाराज आणि नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज यांचे दर्शन झाले. ही गुरुपौर्णिमा ‘न भूतो न भविष्यति ।’, अशी झाली. मी वर्ष १९९३ मध्ये गोवा येथील रामनाथ देवस्थान, वर्ष १९९५ मध्ये कुडाळ आणि वर्ष १९९६ मध्येे सांगली येथे झालेल्या गुरुपौर्णिमेसाठी गेले होते. वर्ष १९९६ नंतर गोव्यात पणजी, म्हापसा, रामनाथ देवस्थान या ठिकाणी आणि नंतर सनातन संस्थेच्या वतीने होणार्या गुरुपौर्णिमांमध्ये मला सहभागी होता आले.
१४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्यांना जाणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या विविध ठिकाणी होणार्या भंडार्यांनाही आम्ही जात होतो. एका वर्षी मी कांदळीला भंडार्याला गेले होते.
१४ इ. प.पू. डॉ. आठवले यांच्या गोव्यात होणार्या अभ्यासवर्गांना जाणे : आम्ही प.पू. डॉ. आठवले यांच्या होणार्या मासिक अभ्यासवर्गांना वेगवेगळ्या ठिकाणी; म्हणजे पणजी, फोंडा, मडगाव इत्यादी ठिकाणी जात होतो.
१४ ई. पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ : फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ‘पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ’ झाले. त्या सर्व यज्ञांसाठी आम्ही दोघेही उपस्थित राहिलो होतो.
१५. प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने करता आलेल्या सेवा
देवानेच माझ्याकडून विविध सेवा करून घेतल्या. माझा कुठलीही सेवा मनापासून आणि जीव ओतून करण्याचा प्रयत्न असतो.
अ. वेगवेगळ्या गावांत सनातन संस्थेच्या सत्संगाचा प्रचार करून प्रवचने आणि सत्संग घेतले.
आ. सनातन संस्थेच्या प्रभातफेर्या आणि सायंफेर्या यांमध्ये सहभाग घेतला.
इ. पाळे येथे सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा साठा आणून प्रदर्शन आणि वितरण कक्ष, तसेच गणपतीपुळे येथील गणपति मंदिरात १ मास सनातन संस्थेच्या ग्रंथांचा प्रदर्शन आणि वितरण कक्ष लावला होता. तिथेही मला सेवेची संधी मिळाली. तेव्हा मी कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक श्री. गिरिधर वझे यांच्याकडे निवासाला राहून ती सेवा केली.
ई. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यानंतर पाळे येथे घरी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या घड्या घालणे आणि अन्य साधकांनाही ती सेवा द्यायचे.
उ. मराठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करायचे, अन्य साधकांच्या साहाय्याने त्याचे वितरण करायचे, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्यापूर्वी आणि नंतर दैनिकाचे वर्गणीदार करायचे, दैनिकाचे वितरण करायचे आणि त्याचा हिशोब (जमा-खर्च) ठेवायचे.
ऊ. प.पू. डॉक्टरांनी फोंडा (गोवा) येथे ‘सर्वधर्म सभा’ आयोजित केली होती. मला या सभेसाठी ‘सभांचे निमंत्रण फलक, पत्रके लावणे’ इत्यादी सेवेत सहभागी होेता आले.
ए. गुरुपौर्णिमेच्या वेळी अन्य साधकांच्या समवेत अर्पण गोळा करायला जाणे आणि पावती पुस्तकांचा हिशोब ठेवायचे.
ऐ. ‘दोनापावला’ येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय चालू झाले. तेव्हा तिथे झोपायला जागा नसल्यास साधक आमच्या घरी झोपायला यायचे. मी त्यांची निवासव्यवस्था करायचे.
ओ. आमच्या घरापासून बांबोळी येथील सरकारी रुग्णालय जवळ असल्याने तिकडे येणार्या साधकांना जेवण द्यावे लागे. तेही मला शक्य होईल, तसे देण्याचा मी प्रयत्न करायचे.
औ. आमच्या पाळे गावात साधक अधिक होते. कुठे सेवेनिमित्त प्रवासाला जायचे असेल, तर आमच्या येथून साधक पणजी, रायबंदर, वास्को, मडगाव इत्यादी ठिकाणी जायचे. तेव्हा त्यांना आवश्यक ते साहाय्य करायचे.
वरील सर्व सेवा प.पू. डॉक्टरांची कृपा आणि अन्य साधकांचे साहाय्य यांमुळे मला करता आल्या.’
– सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२) (हे लिखाण त्या संत होण्यापूर्वीचे आहे.)
(क्रमशः)
|