विद्यार्थ्यांनी एन्.एम्.एम्.टी.च्या सुधारित बसपास योजनेचा लाभ घ्यावा ! – योगेश कडूस्कर, परिवहन व्यवस्थापक
नवी मुंबई – विद्यार्थ्यांनी एन्.एम्.एम्.टी.च्या सुधारित बसपास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी केले आहे. एन्.एम्.एम्.टी.ने विद्यार्थ्यांच्या बसपास योजनेत पालट केला आहे. यामध्ये मासिक ‘नो पंचिंग’ बसपासवर शाळा ते घर या ठिकाणापर्यंत कितीही वेळा त्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही बसमार्गार्ंवर पूर्णपणे वातानुकूलित बसगाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण बसगाड्यांच्या तिकीट दरानुसार मासिक बस पास शुल्क आकारून वातानुकूलित बसगाड्यांमध्ये प्रवास करण्यास मुभा रहाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वयाची २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ही मासिक बसपास योजनेची सवलत घेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे, जादा तासिका आणि शिकवणी यासाठी ये-जा करणे सोयीचे होणार आहे. यांसाठी त्रैमासिक बस पासप्रमाणे ‘नो-पंचिंग’ (जादा फेर्या प्रवास) करण्यास सवलत देण्यात आली आहे.