हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यश लॉन, पिंप्राळा रोड, जळगाव आणि श्रीराम मंदिर, पाळधी, तालुका धरणगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, श्री मनुदेवी देवस्थान, यावलचे सचिव श्री. निळकंठ चौधरी आणि पाळधी येथील महोत्सवास समितीचे श्री. विनोद शिंदे आणि हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी संबोधित केले.
या वेळी इयत्ता १० वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा आणि सेवा म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे श्री. भिका मराठे, सौ. अनिता पोळ आणि श्री. राहुल धनगर यांचा सत्कार करण्यात आला.
मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी वस्त्रसंहिता लागू होणे आवश्यक ! – नीलकंठ चौधरी, सचिव, मनुदेवी संस्थान, यावल
हिंदूंनी धर्माचरणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. मंदिरात येतांना सात्त्विक वेशभूषा असली, तर मंदिरातील चैतन्याचा लाभ सर्व भक्तांना मिळेल. आपण जागरूक असलो, तर देवतांची विटंबना होणार नाही आणि देवालयाचा लाभ सर्व हिंदूंना होईल.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन, धन अर्पण करून सहभागी व्हा ! – मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, हिंदु राष्ट्र सेना
समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी करणार्या घटना केवळ वाचून किंवा ऐकून विसरून जाऊ नका. हिंदूंवरील अन्याय थांबवायचा असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे. हिंदु राष्ट्र हे हिंदुहिताचे, धर्माधिष्ठित आणि आदर्श अशा प्रभु श्रीरामाच्या रामराज्यासारखे, तसेच शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे न्याय्य असेल. प्राचीन काळापासून भारतमातेला असलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन, धन यांनी सहभागी व्हा !
क्षणचित्रे
१. गुरुपौर्णिमेचा प्रसार पाळधी येथील डिजिटल बोर्डद्वारे करण्यात आला. २. जळगाव येथील ‘यश लॉन्स’चे मालक श्री. अतुल जैन यांचा सत्कार करण्यात आला. |