मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !
मुंबई – मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी गाडीने एकत्र प्रवास केला. या भेटीनंतर अभिजित पानसे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी गेले, तर संजय राऊत मातोश्री बंगल्यावर गेले. संजय राऊत आणि अभिजित पानसे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे गट अन् मनसे एकत्र येण्याची चर्चा झाली, अशी चर्चा चालू आहे. या भेटीविषयी अभिजित पानसे यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. याविषयी संदीप देशपांडे म्हणाले की, युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून पाठवण्यात आलेला नाही. यापूर्वी आम्ही वर्ष २०१४ आणि २०१७ मध्ये ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला होता; परंतु तेव्हा अत्यंत नकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आता आम्ही प्रस्ताव देण्याचा विषय येत नाही.
अभिजीत पानसे संजय राऊत यांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आले. यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे आल्याच्या चर्चांना उधाण आलं.@abhijitpanse#AbhijitPanse #SanjayRaut #MNS #ShivSena #MaharashtraPolitics #MTCard pic.twitter.com/U5e0fJLgK2
— Mumbai Tak (@mumbaitak) July 6, 2023
उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र यावे, अशा आशयाचे फलक प्रथम मुंबई, ठाणे आणि नंतर पुणे, नाशिक येथेही झळकले आहेत.