अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या अफवा यशस्वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मुंबई – अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये-उदय सामंत https://t.co/XhPYQexhif pic.twitter.com/28QrvYXoWX
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) July 5, 2023
या वेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत का ? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलतांना उदय सामंत म्हणाले, ‘‘एक वर्षापूर्वी ज्या पक्षातून आम्ही आलो त्यांच्याकडे परत जाण्याचा किंवा त्यांनी आमच्याकडे येण्याचा प्रश्न नाही. सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला अन्य कुणाची आवश्यकता नाही.’’