शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे निलंबन !
मुंबई – शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ६ जुलै या दिवशी देहली येथे झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांचेही निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार यांचाही समावेश आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार यांनी कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे वेळ आल्यावर कळेल. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचे म्हटले.