अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या आमदारांचा विरोध !

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अदिती तटकरे

मुंबई – शिवसेना-भाजप यांना पाठिंबा देऊन मंत्रीपदाची शपथ घेणार्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या अदिती तटकरे यांना रायगड जिल्‍ह्याचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या रायगडमधील आमदारांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्‍या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्‍यास विरोध दर्शवला आहे. याविषयी भरतशेठ गोगावले म्‍हणाले, ‘‘आम्‍ही शिवसेना-भाजप युतीमधून निवडून आलो आहोत. आम्‍ही राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलेले नाही. पूर्वीच मला रायगडचे पालकमंत्रीपद द्यायचे निश्‍चित झाले होते.’’