गोहत्‍येच्‍या निषेधार्थ वासुली (जिल्‍हा पुणे) येथील बाजारपेठ बंद !

(प्रतिकात्मक चित्र)

आंबेठाण – आषाढी एकादशी दिवशी कडूस येथे झालेल्‍या गोहत्‍येच्‍या निषेधार्थ खेड तालुक्‍यातील वासुली फाटा येथील बाजारपेठ बंद ठेवण्‍यात आली. भीमा आणि भीमा नदीच्‍या पलीकडील भागात या घटनेचा निषेध करण्‍यासाठी येथील गावांनी ‘गाव बंद’ची हाक दिली होती. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांनी बंदमध्‍ये उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवला. या घटनेमध्‍ये कह्यात घेतलेल्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्‍हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका :

असाच संघटितपणा दाखवल्‍यास यापुढे असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कुणी करणार नाही. यावरूनच संघटितपणाचे महत्त्व लक्षात येते !