वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्याचे आवाहन !
अकोला – वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाविषयी उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, अशी समयमर्यादा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी येथे त्यांना घातली आहे. ते अकोला येथे आज बोलत होते.
VBA And Sena Alliance? | पंधरा दिवसात युतीचा निर्णय घ्या! आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम@OfficeofUT @Prksh_Ambedkar#prakashambedkar #uddhavthackeray #Shivsena #vanchit_bahujan_aaghadi pic.twitter.com/kF8jhbG2hP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 6, 2023
प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ आहे, असेही ते या वेळी म्हणाले.