मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या ११ पैकी ७ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या गटबाजीनंतर आता २ गट आमने-सामने पहायला मिळत आहेत. त्यामुळे आमदारांची जमवाजमव दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. अशातच राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्या मराठवाडा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ११ पैकी ७ आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यातील विधान सभेचे ५ आणि विधानपरिषदेचे २ आमदार अजित पवार यांच्या गटात आहेत.